वरंधा घाटरस्ता वाहतुकीसाठी खुला

शिरगाव, उंबार्डेवाडी हद्दीतील रस्ता दुरुस्ती काम अपूर्णच

भोर – अतिवृष्टीच्या काळात भोर-महाड राज्य मार्गावरील वरंधा घाटातील रस्त्याची मोठ्या प्रमाणात पडझड झाली होती. अनेक ठिकाणी घळी पडून रस्ताच वाहून गेल्याने गेल्या 5 महिन्यांपासून वाहतूकीस बंद असलेला रस्ता दुरुस्त करुन गुरुवार (दि. 16) पासून वाहतूकीस सुरु करण्यात आला आहे. या मार्गावरील शिरगाव आणि उंबार्डेवाडी हद्दीतील दोन ठिकाणचे काम अपूर्णच आहे, त्यामुळे वाहचालकांना सावध राहूनच वाहने चालवावी लागत आहेत.

भोर तालुक्‍यात 4 ते 13 ऑगस्ट 2019 या काळात अतिवृष्टी झाली. भोर-महाड मार्गावरील शिरगाव, उंबार्डेवाडी, या गांवाजवळील आणि वरंधा घाटातील माझेरी ते पारमाची पर्यंतच्या रस्त्याला तीन ठिकाणी दरडी कोसळून रस्ता वाहून गेला होता. त्यामुळे हा घाट रस्ता पाच महिन्यांपासून वाहतुकीस बंद होता.शिरगाव हे भोर तालुक्‍यातील चेरापुंजी म्हणून ओळखले जाते. या परीसरात सुमारे 4 हजार मि.मी.पर्यंत पाऊस होतो. अतिवृष्टीकाळात या गावच्या शिवेवरील रस्ताच वाहून गेल्याने रस्त्याला मोठे भगदाड पडून रस्ता वाहतुकीस बंद झाला होता.

असे असताना या मार्गावरील रस्त्याच्या दुरुस्तीसाठी शासनाने 1 कोटी 75 लाख रुपयांचा निधी मंजूर केला असताना शिरगाव येथील रस्त्याला पडलेले भगदाड बुजवून खालच्या बाजूस गॅबेलियन पद्धतीची दगडी भिंत उभारण्यात येत असुन तीचेही काम अर्धवटच आहे. भोर-महाड मार्गावरील सुमारे 50 ते 55 कि.मी.अतराच्या मार्गावरील 34 कि,मी.अंतराचे रिंग रोड व घाट रस्त्याचे कामासाठी 9 कोटी 72 लाख रुपये मंजूर असून या रस्त्याचे काम अतिवृष्टी काळात वाहून गेल्याने या रस्त्याचे काम पुन्हा करावे लागत आहे. या रस्त्याचे काम सद्या सुरु असून काम लवकर पुर्ण करण्याचे धोरण ठेकेदाराने अवलंबले असल्याचे पहायला मिळत आहे.

अतिवृष्टीकाळात रस्त्यावर पडलेले खड्डे बुजविण्याचे काम पूर्ण झाले असुन शिरगाव व उंबार्डेवाडी येथील संरक्षण भिंतींची कामे येत्या आठ दिवसांत पूर्ण करण्याच्या सुचना ठेकेदारास दिल्या आहेत. मात्र रस्ता वाहतुकीस सुरळीत केला असून या मार्गावरुन वाहनांची ये-जा सूरु झालेली आहे. या घाट रस्त्याच्या दुरुस्तीसाठी शासनाकडे प्रस्ताव सादर केले होते, त्या नुसार शासनाने भोर ते महाड या मार्गावरील घाट रस्त्याचे कामासाठी 1 कोटी 75 लाख रुपये मंजूर केले आहेत. त्यातून आज अखेर 1 कोटी 56 लाख रुपये खर्चाची कामे झाली आहेत.
आर. एल. ठाणगे, उपअभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here