व्हिएन्ना – पेट्रोलियम उत्पादक निर्यातदार देशांची संघटना, “ओपेक’ आणि रशियासह इतर सहकारी देशांनी तेलाच्या उत्पादनात प्रतिदिन पाच लाख बॅरल इतकी कपात करण्याचा निर्णय घेतला आहे. तेलाचा मोठा साठा आणि जागतिक आर्थिक वृद्धीचा मंदावलेला दर पहाता या प्रस्तावाला व्हिएन्ना इथे झालेल्या बैठकीत मंजुरी देण्यात आली. येत्या 1 जानेवारी 2020 पासून हा निर्णय लागू होईल. त्यायोगे ऑक्टोबर 2018 च्या तुलनेत तेलाचे उत्पादन 17 लाख बॅरलनी कमी होण्याची अपेक्षा आहे.
याशिवाय सौदी अरबसह इतर अनेक देशही तेलाचे अतिरिक्त उत्पादन घेणे कमी करणार असल्याचे ओपेकच्या निवेदनात म्हटले आहे. ओपेक आणि सहकारी देश पुढील वर्षी मार्च महिन्यात एक विशेष बैठक घेऊन तेलाच्या उत्पादनाच्या स्थितीचा आढावा घेणार आहेत.