वायसीएमध्ये सर्वसामान्यासाठी ओपीडी सुरु – महापौर माई ढोरे

पिंपरी – पिंपरी चिंचवड शहरात करोना रुग्णांची संख्या घटत आहे. त्यामुळे सध्या पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या यशवंतराव चव्हाण स्मृती (वायसीएम) रुग्णालयात इतर आजार असलेल्या रुग्णांसाठी आजपासून ओपीडी सुरु करण्यात आली आहे. त्यामुळे करोना रुग्णांशिवाय इतर आजाराच्या रुग्णांना बाहयरुग्ण सेवा मिळणार आहे. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना आणि पुणे जिल्ह्यातील ग्रामीण भागातील नागरिकांना आता मोठा दिलासा मिळाला आहे. अशी माहिती महापौर माई ढोरे यांनी दिली.

करोना संसर्गाची दुसरी लाट मार्चपासून सुरू झाली होती. तेव्हापासून संपूर्ण यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालय हे करोना रुग्णांसाठी समर्पित करण्यात आले होते. पिंपरी चिंचवडमध्ये करोनाचा प्रसार झपाट्याने वाढला होता. दररोज करोना रुग्णांची संख्या लक्षणीय होती. अशा परिस्थितीत महापालिकेच्या वायसीएम रुग्णालयात रुग्ण मोठ्या प्रमाणावर दाखल होऊन बरे झाले आहेत. शहरात करोना रुग्णांची संख्या आता आटोक्‍यात आली आहे. त्यामुळे आता बाहयरुग्णांसाठी वायसीएम रुग्णालयामध्ये ओपीडी सुरू करण्यात आली आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.