पोखरणमध्ये सरावादरम्यान BSF जवान शहीद

फायरिंग रेंजमध्ये 4 दिवसात दुसरा अपघात

जोधपूर – राजस्थानमधील पोखरण फायरिंग रेंजमध्ये मंगळवारी रात्री सैन्याच्या सरावादरम्यान एक दुर्घटना घडली. 105 एमएम गन (तोफ)मधून निघताच एक गोळा जागेवर फुटला. या दुर्घटनेत BSF मधील एक जवान शहीद झाला, तर 3 जण जखमी झाले. याप्रकरणी BSF ने चौकशीचे आदेश दिले आहेत. मागील 4 दिवसातील पोकरणमध्ये 105 एमएम गनमुळे हा दुसरा अपघात झाला आहे. चार दिवसांपूर्वी गनची बॅरेल फुटल्यामुळे एक जवान जखमी झाला होता.

BSF सध्या पोखरणमधील फायरिंग रेंजमध्ये सराव करत आहेत. सीमेजवळ किशनगडमध्ये BSF ची स्वतःची फायरिंग रेंज आहे. पण, 105 एमएम गनची रेंज 17 किलोमीटर असल्यामुळे गोळे दागण्याच्या सरावासाठी मोठी फायरिंग रेंजची आवश्यकता आहे. पोकरणमध्ये मोठी फायरिंग रेंज असल्यामुळे बीएसएफ येथे सराव करत आहे.

मंगळवारी रात्री सरावादरम्यान गनमधून बाहेर निघताच गोळा फुटला. या दुर्घटनेत चार जवान जखमी झाले होते. उपचारादरम्यान उत्तर प्रदेशचे रहिवासी असलेले जवान सतीश यांचा मृत्यू झाला. इतर तिघांचा उपचार सुरू आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.