…तरच वाढीव विकासदर शक्‍य 

मनुष्यबळ विकास निर्देशांकांत मोठ्या प्रमाणात वाढ होण्याची गरज 
मनुष्यबळ निर्देशांकांत भारत जगात 131 व्या क्रमांकावर 
भारताचा सध्याचा विकासदर केवळ 7.5 टक्‍के आहे. तो जर 10 टक्‍के करायचा असेल तर भारतातील तरुण सुदृढ आणि कुशल असण्याची गरज आहे. त्यात आता गुंतवणूक केली तर परिणाम मिळण्यासाठी तब्बल एका पिढीचा काळ लागत असतो. 
अमिताभ कांत, मुख्य कार्यकारी अधिकारी, नीती आयोग 
नवी दिल्ली: भारतात सध्या 10 टक्‍के विकासदराची भाषा केली जात आहे. मात्र, त्यासाठी मनुष्यबळ विकास निर्देशांकांत वाढ अपरिहार्य आहे. या निर्देशांकात वाढ झाल्याशिवाय विकासदर 10 टक्‍क्‍यापयॅंत जाणे शक्‍यच नसल्याचे नीती आयोगाचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमिताभ कांत यांनी सांगितले आहे.
बालकांच्या अधिकारावरील कार्यक्रमात बोलताना त्यांनी सांगितले की, भारताचा विकासदर तीस वर्षे 10 टक्‍के राहिला तरच भारत विकसित देश होऊ शकणार आहे. सध्या आपला विकासदर 7.5 टक्‍के आहे. तो सध्याच्या मनुष्यबळाच्या दर्जावर आधारित आहे. त्यात आणखी अडीच टक्‍के वाढ करायची असेल तर त्या प्रमाणात मनुष्यबळ विकास निर्देशांक वाढ होणे आवश्‍यक आहे.
मात्र, मनुष्यबळ विकास निर्देशांकात मोठ वाढ होणे तितकेसे सोपे नाही. सध्या भारतात बालमृत्यूचे प्रमाण जास्त आहे. त्याचबरोबर मुल जन्मताना माता मृत्यू पावण्याचे प्रमाणही जास्त आहे. त्याचबरोबर जन्माला आलेल्या मुलात कुपोषणाचे प्रमाणही जास्त आहे. त्यानंतर प्रश्‍न निर्माण होतो तो त्या सर्व मुलांना देण्यात येणाऱ्या शिक्षणाच्या दर्जाचा. या आघाडीवरही आपण मागे आहोत. आतापासून या विषयावर गुंतवणूक करायला सुरुवात केली तरी त्यासाठी बराच वेळ लागतो. या विषयावर अगोदरच काम सुरू करणे गरजेचे होत. कारण याला एक पिढीचा कालवधी लागतो, असे त्यांनी यावेळी सूचित केले.
या क्षेत्रात भारताची कामगिरी अतिशय खराब आहे. संयुक्त राष्ट्राच्या मनुष्यबळ विकास निर्देशांकांच्या यादीत आपण गेल्या वर्षी 130 व्या क्रमांकावर होतो. या वर्षी त्यात सुधारणा होण्याऐवजी आपण 131 व्या क्रमांकावर आलो आहोत. म्हणजे गेल्या दोन वर्षातही या विषयावर आपली कामगिरी स्पर्धात्मक नसल्याचे दिसून येते. या यादीत जगातील एकूण 188 देश आहेत. देशातील गरिबीची व्याप्ती इतकी मोठी आह, की सरकार कमी वेळेत त्याबाबत काही करू शकत नाही. त्यामुळे या क्षेत्रात खासगी क्षेत्राने पुढाकर अधिक घेण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले. ते म्हणाले की देशात अतिमागास जिल्ह्याची संख्या तब्बल 200 इतकी आहे. त्या क्षेत्रावर लक्ष केंद्रित केल्यास बराच फरक पडू शकतो.
-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)