ठाकरे सरकारमध्ये फक्त बोलणारे

मुंबई –  राज्यातील  अतिवृष्टीमु ळे नुकसान झालेल्या पिकांबाबत  राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि विधानसभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस परतीच्या पावसाने फटका बसलेल्या जिल्ह्यांचा दौरा करत असून परिस्थितीची पाहणी करत आहेत.

यादरम्यान, त्यांनी  पत्रकारांशी संवाद साधताना शेतकऱ्यांच्या मागे तगादा लावू नये, सरकारने बँकांना आदेश द्यावेत अशी मागणी केली.

ते म्हणाले की,’सगळे मंत्री रोज माईक घेऊन बोलत आहेत, मीडियात येऊन बोलत आहेत. पण शेवटी पाहणार कोण आहे? निर्णय कोण घेणार आहे? सरकार निर्णय घेण्यासाठीच आहे. कोणताही निर्णय होताना दिसत नसून फक्त टोलवाटोलवी सुरु आहे.मला असं वाटतं की ठाकरे  सरकारमध्ये फक्त बोलणारे आहेत. त्यामुळे बोलवघेवडेपणा सोडा आणि कृती करा.’

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.