ओझर : आदिवासी बांधवाची मते घेऊन आतापर्यंत अनेक लोकप्रतिनिधी झालेत. मात्र आदिवासी भागाचा विकास झाला नाही. आदिवासी भागातील विकासाला दिशा देण्याचे काम सत्यशील शेरकर हेच करू शकतात. खासदार डॉ. अमोल कोल्हे यांना या भागात मोठे मताधिक्य मिळाले. तसेच मताधिक्य सत्यशील शेरकर यांना मिळणार असा विश्वास आदिवासी समाजाचे नेते व पंचायत समितीचे माजी सदस्य काळूशेठ गागरे यांनी कुकडेश्वर येथे व्यक्त केला.
जुन्नर विधानसभेतील महाविकास आघाडीचे उमेदवार सत्यशिल शेरकर यांचा प्रचार दौऱ्या निमित कुकडेश्वर – पूर येथे मतदारांशी संवाद साधताना काळूशेठ गागरे हे बोलत होते. याप्रसंगी शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे पुणे उपजिल्हाप्रमुख शरद चौधरी, पुणे जिल्हा परिषदेच्या माजी सदस्या सुरेखा मुंढे, जुन्नरचे माजी नगराध्यक्ष सुनील मेहेर , श्री विघ्नहर कारखान्याचे संचालक देवेंद्र खिलारी, सरपंच उषा दिवटे, विलास दिवटे,ठकासोनु दिवटे, किसन दिवटे, खंडु मुठे, मंगेश हेमाने, ओंकार दिवटे ज्ञानेश्वर दिवटे, सखाराम खिल्लारी आदी मान्यवर उपस्थित होते.
काळूशेठ गागरे म्हणाले कि, सत्यशील शेरकर हे सक्षम नेतृत्व असल्याने शरद पवारांनी त्यांना उमेदवारी देऊन विश्वास टाकला आहे. सत्यशील शेरकर हे निवडून गेल्यानंतर मंत्रिपद मिळण्याची संधी आहे. श्री विघ्नहर सहकारी साखर कारखान्याच्या माध्यमातून शेतकऱ्यांचे हित साधण्याचे काम शेरकर कुटुंबाने अनेक वर्ष केले आहे.
कुकडेश्वर मंदिराची पडझड झाली. त्यावेळी श्री विघ्नहर कारखान्याने मोठी आर्थिक मदत देऊन हे कुकडेश्वर उभारण्यासाठी हातभार लावला आहे, त्यांची मदत, त्यांचे दातृत्व आजही आदिवासी बांधव विसरलेला नाही. कुकडेश्वर मंदिराचा कळस उभारण्याचे कामही शेरकर कुटुंबीयांनी करावे असे मनोगत व्यक्त केले .
सत्यशील शेरकर म्हणाले कि, कुकडेश्वर मंदिर पुनर्रउभारणीत श्री विघ्नहर कारखान्याच्या सभासदांचे विशेष सहकार्य लाभले आहे. कुकडेश्वर मंदिराचे कळस उभारण्यासाठी अनेक वेळा पत्रव्यवहार पुरात्व विभागाकडे करण्यात आला आहे मात्र अद्याप परवानगी दिलेली नाही. ज्या दिवशी परवानगी मिळेल त्यावेळेस निश्चितच मंदिर कळसही उभारला जाईल असे आश्वासन सत्यशील शेरकर यांनी दिले.
शरद पवार, उद्धव ठाकरे, राजीव गांधी यांच्या विचारांचे सरकार राज्यात येणार असल्याने लोकप्रतिनिधी म्हणून मला काम करण्याची संधी द्यावी. आपल्या आदिवासी भागातील प्रश्न मी जाणून घेतले आहेत. ते निश्चित सोडवण्यासाठी प्रयत्नशील राहील असे आश्वासन त्यांनी यावेळी दिले.