पुणे – करोनाचा प्रादुर्भाव नियंत्रणात आणण्यासाठी शहरातील दहा पोलिस ठाण्यांच्या हद्दीतील परिसरात २३ एप्रिलच्या मध्यरात्री १२ पर्यंत पूर्णपणे मनाई आदेश लागू केले आहेत. या काळात या ठिकाणी सकाळी दहा ते दुपारी १२ पर्यंत या वेळेत दूध विक्री करण्यास परवानगी देण्यात आली आहे.
पोलिस सहआयुक्त डॉ. रवींद्र शिसवे यांनी मनाई आदेश काढले असून या परिसरात औषधे आणि दूध वगळता सर्व प्रकारचा विक्रीस मनाई केली आहे. मंगळवारी रात्री हे आदेश काढले. दुधाच्या वाहतुकीवर बंधन घालण्यात आले नसले तरी दूध विक्रीची घरपोच सेवा देता येणार नाही.
हे आहेत नवीन प्रतिबंधित क्षेत्र
परिमंडळ एक
– समर्थ, खडक आणि फरासखाना पोलिस ठाण्याच्या अखत्यारित येत असलेला संपूर्ण परिसर.
परिमंडळ दोन
– स्वारगेट पोलिस ठाणे – गुलटेकडी, महर्षीनगर, डायसप्लाॅट
– बंडगार्डन पोलिस ठाणे- ताडीवाला रस्ता
परिमंडळ तीन
– दत्तवाडी पोलिस ठाणे- जनता वसाहत, पर्वती दर्शन परिसर, शिवदर्शन
परिमंडळ चार
– येरवडा पोलिस ठाणे-लक्ष्मीनगर, गाडीतळ
– खडकी पोलिस ठाणे- खडकी बाजार, कसाई मोहल्ला, पाटील इस्टेट झोपडपट्टी
परिमंडळ पाच
– कोंढवा पोलिस ठाण्याचा संपूर्ण भाग
– वानवडी पोलिस ठाणे- विकासनगर, सय्यदनगर, रामटेकडी,चिंतामणी नगर, वॉर्ड क्रमांक २४, हांडेवाडी, वॉर्ड क्रमांक २६ आणि २८.