पिंपरी– पिंपरी चिंचवड शहरामध्ये केंद्र सरकारच्या मार्गदर्शक सूचनानुसार 18 वर्षांवरील सर्वांना करोना प्रतिबंधक लस देण्यात येत आहे. महापालिकेकडील कोविशिल्ड लसीचा साठा संपल्याने उद्या (दि. 23) शहरात कोविशिल्ड लस मिळणार नाही. शहरातील 8 केंद्रांवर कोव्हॅक्सिन लसीचा पहिला व दुसरा डोस देण्यात येणार आहे.
शहरातील ह.भ.प. प्रभाकर मल्हारराव कुटे मेमोरियल हॉस्पिटल आकुर्डी, प्रेमलोक पार्क दवाखाना, मासूळकर कॉलनी आय हॉस्पिटल, जुने खिवसंरा पाटील हॉस्पिटल थेरगाव, नवीन भोसरी रुग्णालय, स्वामी विवेकानें बॅटमिंटन हॉल शिवतेजनगर यमुनानगर, जुने जिजामाता रुग्णालय व निळू फुले नाट्यगृह पिंपळे गुरव या 8 केंद्रांवर कोव्हॅक्सिन लस देण्यात येणार आहे.
प्रत्येक केंद्रावर पहिल्या डोससाठी 200 व दुसऱ्या डोससाठी 300 डोसची क्षमता आहे. सर्व केंद्रावर पहिल्या डोससाठी 5 लाभार्थी कोविन ऍपवर ऑनलाइन स्लॉट बुकींग केलेले, किऑस्क पद्धतीने टोकन घेतलेले 20 व उर्वरित लाभार्थ्यांना ऑन द स्पॉट रजिस्ट्रेशननुसार डोस देण्यात येणार आहे. कोविन ऍपवर नोंदणी करण्यासाठी गुरूवारी (दि. 23) सकाळी 8 वाजता स्लॉट बुकींगसाठी ओपन होतील. महापालिकेच्या लसीकरण केंद्रावर दिव्यांग व तृतीयपंथी लाभार्थ्यांना लसीकरणासाठी प्राधान्य देण्यात येईल.