नगर – राज्य परिवहन महामंडळाने प्रवाशांसाठी स्मार्ट कार्ड योजनेची अंमलबजावणी सुरू केली आहे. त्या स्मार्टकार्डवर एक जानेवारीपासून प्रवास सवलत दिली जाणार आहे. त्यामुळे स्मार्ट कार्ड नोंदणी करण्यास 31 डिसेंबर शेवटची मुदत आहे. ज्यांच्याकडे स्मारकात असेल अशांना एक जानेवारीपासून अर्ध्या तिकिटाची सवलत मिळणार आहे.
एसटी बसमधून माफक दरात प्रवास करण्यासाठी ज्येष्ठ नागरिकांना आता पास ऐवजी महामंडळाकडून आधार क्रमांकाशी जोडलेल्या अत्याधुनिक स्मार्ट कार्ड दिले जाणार आहे. महामंडळाकडून प्रवाशांना विविध सवलती दिल्या जातात. त्यात ज्येष्ठ नागरिकांना प्रवासात सवलत दिली जाते. या व्यतिरिक्त बसने नियमित प्रवास करणाऱ्या प्रवाशांना पास दिले जातात. यासाठी आता एसटी महामंडळाकडून मिळणाऱ्या विविध प्रवास दर सवलतीसाठी स्मार्ट कार्ड घेणे अनिवार्य करण्यात आले.
या योजनेत प्रवाशांना कागदी पास ऐवजी स्मार्ट कार्ड दिले जाणार आहे. परिवहन महामंडळाकडून ज्येष्ठ नागरिकांसह दिव्यांग, महात्मा गांधी समाजसेवा आदिवासी सेवा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर समाज भूषण, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे पुरस्कार प्राप्त नागरिक व अधिस्वीकृती पत्रकारांना मोफत व सवलतीच्या दरात प्रवास करण्यासाठी पास दिला जातो. हा पास साध्या पद्धतीने होता.
मात्र आता डिजिटलायझेशन दिशेने वाटचाल करणाऱ्या महामंडळाकडून सध्या पाच ऐवजी स्मार्टकार्ड दिले जात आहे. या स्मार्टकार्डवर एसटी पासधारकांनाचे नाव, बसचा प्रकार, प्रवासाची मुदत अशा सर्वच गोष्टी नमूद केल्या जात आहेत. हे कार्ड संबंधित सवलती धारकांनाच आधार क्रमांकाची जोडले जात आहेत
ज्या जेष्ठ नागरिक नोंदणी करून स्मार्ट कार्ड घेणार नाहीत, त्यांना एक जानेवारीपासून प्रवास करताना सवलत मिळणार नाही. त्यांना एक जानेवारीपासून एसटीतून प्रवास करताना तिकीट दर पूर्ण दावा लागणार आहे.
पास ऐवजी स्मार्टकार्ड
राज्य परिवहन महामंडळातर्फे वयाची 65 वर्ष पूर्ण करणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांनासाठी यापुढे वार्षिक मोफत प्रवास पास स्मार्ट कार्ड स्वरुपात देण्यात येणार आहे. यानुसार 4 हजार किमी प्रवास ज्येष्ठांना करता येणार आहे. एसटी महामंडळाच्या नगर विभागातील अकरा आगारात 84 हजार 200 ज्येष्ठ नागरिकांनी स्मार्ट कार्ड साठी नोंदणी केली.