इंदापुरच्या विकासासाठीच सुतगिरणीऐवजी साखर कारखाना

तालुक्‍याच्या प्रगतीती नीरा-भीमाचा मोठा वाटा असल्याची हर्षवर्धन पाटील यांची माहिती

निलकंठ मोहिते

रेडा- इंदापूर तालुक्‍याच्या वैभवात भर घालण्यासाठी, तालुक्‍यात सूतगिरणी उभारण्याचा प्रस्ताव सर्वात प्रथम मांडण्यात आला होता, त्यासाठी शेतकऱ्यांनी व इतरांनी अर्थसाहाय्यही गोळा केले होते. परंतु, माजी खासदार कै. शंकरराव पाटील यांनी भविष्याचा विचार करून तालुक्‍यात सूतगिरणीऐवजी साखर कारखाना उभा करावा, असे सांगितल्याने नीरा-भीमा साखर कारखान्याची उभारणी झाली. आज, या कारखान्यामुळे इंदापूर तालुक्‍यासह करमाळा, फलटण, माढा या तालुक्‍यांतील शेतकऱ्यांचा व परिसराचाही कायापालट झाला असल्याचे

माजी सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील यांनी सांगितले.
इंदापुरातील पूरग्रस्त तसेच दुष्काळजन्य गाव परिसरांची पाहणी माजीमंत्री पाटील यांनी केली, त्यानंतर ते “प्रभात’शी बोलत होते. ते म्हणाले की, साखर कारखान्यांना ऊस उपलब्धतेसाठी मोठी स्पर्धा करावी लागणार आहे. इंदापूर तालुक्‍यात पावसाचे प्रमाण कमी असले तरी पाण्याचे योग्य नियोजन तसेच शेतकरी अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनानुसार कर्मयोगी आणि निरा-भीमा कारखान्याने गळित हंगाम नेहमीच यशस्वीरित्या पार पाडले आहेत. यावर्षीही या दोन्ही कारखान्यांनी गळिताचे योग्य नियोजन सुरू आहे.

माजीमंत्री पाटील म्हणाले की, इंदापूर तालुक्‍यातील शेतकऱ्यांची आर्थिक प्रगती होण्यात नीरा-भीमाचा मोठा वाटा आहे. नीरा-भीमा साखर कारखान्याने केवळ गळितावरच भर न देता 18 मेगावॅट सहवीज निर्मितीचा प्रकल्पही उभारला आहे व गाळप क्षमतेचा विस्तार आणि आधुनिकीकरणासह शेतकऱ्यांना अधिकाधिक दर देण्यावर कारखान्याचा नेहमीच भर राहिला आहे. कारखान्याकडे 18 मे.वॅट. सहविजनिर्मिती प्रकल्प आहे. या प्रकल्पातून मिळणारी 6 मॅगावॅट विज कारखान्याच्या उत्पादनासाठी वापरात येत आहे. तर 12 वॅट वीज महावितरणला दिली जाते; त्यामुळे वीजेची बचत तसेच विक्रीतून कोट्यवधी रुपयांचा खरेदी टॅक्‍सची बचत होत आहे. 90 लाख लिटरपर्यंत प्रॉडक्‍शन निर्मिती करण्यात येते, यातून नीरा-भीमा कारखान्याला 30 ते 35 कोटी मिळतात, अशी सांगून पाटील म्हणाले की, गाळप क्षमतेचे विस्तारीकरण करताना 70 टनी 87 के.जी.चा अद्यावत बॉयलर कारखान्याने उभारला असयाचेही माजीमंत्री पाटील यांनी सांगितले

  • शेतकऱ्यांना ठिबकसाठी कारखान्याच्या वतीने अनुदानही पुरविले जाते. यातून उसाची उत्पादकता वाढविण्यातही कारखाना यशस्वी ठरला आहे. दुष्काळीस्थितीत कमी क्षेत्रात उसाचे अधिकाधिक उत्पादन कसे घ्यावे, याकरिता शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यात येते. गेल्या पाच ते सहा वर्षांपासूनच कारखान्याने ठिबकवर भर दिल्याने नीरा-भीमाला ऊस देणारा शेतकरी आधुनिक झाला आहे, याचा फायदा आता होतो आहे. उसाचे क्षेत्र कमी असले तरी उत्पादन कमी पडणार नाही.
    – धिरजकुमार माने, कार्यकारी संचालक, नीराभिमा, सहकारी साखर कारखाना
Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here