शिवसेनेसोबत चर्चा केल्यानंतरच राणेंचा भाजप प्रवेश-चंद्रकांत पाटील

मुंबई : भाजपमध्ये प्रवेश करण्यासाठी उत्सूक असलेले महाराष्ट्र स्वाभिमानी पक्षाचे प्रमुख नारायण राणे यांच्या मार्गात शिवसेनेचा स्पीड ब्रेकर येण्याची शक्‍यता आहे. नारायण राणे यांनी भाजपमध्ये आपला पक्ष विलीन करणार असल्याचे नुकतेच जाहीर केले होते. 1 सप्टेंबरला अमित शहा यांच्या उपस्थितीत त्यांच्या पक्षप्रवेशाचा कार्यक्रमही ठरला होता. मात्र, अचानकपणे हा कार्यक्रम लांबवणीवर पडल्याने राजकीय चर्चांना उधारण आले होते. या पार्श्वभूमीवर राज्याचे महसूलमंत्री आणि राज्य भाजपमधील दुसऱ्या क्रमांकाचे नेते चंद्रकांत पाटील यांनी नवा खुलासा केला आहे. शिवसेनेने ग्रीन सिग्नल न दिल्यामुळेच राणेंचा भाजप प्रवेश रखडल्याची कबुली त्यांनी दिली.

शिवसेनेची हरकत नसेल तरच नारायण राणेंना भाजपात प्रवेश दिला जाईल. त्यामुळे आता नारायण राणेंचा भाजपा प्रवेश शिवसेनेच्या मर्जीवर अवलंबून आहे. तेव्हा शिवसेना आता काय भूमिका घेणार, याकडे राणेंसह सगळ्यांचे लक्ष लागले आहे. राणेंच्या भाजपा प्रवेशाने कोकणातील राजकीय समीकरण पुन्हा एकदा बदलणार आहे. राणेंना पक्षात घेऊन भाजपाने शिवसेनेला शह दिल्याची चर्चा आहे. राणेंचा पक्ष प्रवेश हा शिवसेना विरोधामुळे लांबला होता.

Leave A Reply

Your email address will not be published.