नवी दिल्ली – नोव्हेंबर महिन्यात ओमायक्रॉचा प्रभाव तितकासा जास्त नसतानाही औद्योगिक उत्पादनात केवळ 1.4 टक्के वाढ नोंदली गेली आहे.
डिसेंबर महिन्यापासून मायक्रॉनचा विविध क्षेत्रावर परिणाम होण्याची शक्यता आहे. त्यामुळे पुढील काही महिने औद्योगिक उत्पादन यापेक्षा कमी होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. मॅन्युफॅक्चरींग क्षेत्राची क्षेत्राची उत्पादकता नोव्हेंबर महिन्यामध्ये फारशी वाढलेली नाही. हे क्षेत्र केवळ 0.9 टक्क्यांनी वाढले आहे.
खान क्षेत्राची उत्पादकता पाच टक्क्यांनी आणि वीज क्षेत्राची उत्पादकता 2.1 टक्क्यांनी वाढली आहे. गेल्या वर्षी करोना व्हायरसमुळे नोव्हेंबर महिन्यामध्ये औद्योगिक उत्पादन उणे 1.6 टक्के इतके नोंदले गेले होते. एप्रिल -नोव्हेंबर 2021 या कालावधीत औद्योगिक उत्पादन 17.4 टक्क्यांनी वाढले आहे.
मात्र नोव्हेंबरनंतर औद्योगिक उत्पादनात वेगाने घट होत आहे. ओमायक्रॉनचा प्रभाव वेगाने कमी झाला तर परिस्थिती सुधारू शकते असे वाणिज्य मंत्रालयाला वाटते.