राज्यस्तरीय ऑनलाइन शिक्षक विकास मंच सुरू

ऑनलाइन शिक्षण सुरू ठेवण्यासाठी विद्या प्राधिकरणाकडून उपक्रम

 

पुणे – महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संसोधन व प्रशिक्षण परिषदेच्या (विद्या प्राधिकरण) वतीने ऑनलाइन शिक्षण सुरू ठेवण्यासाठी राज्यस्तरीय ऑनलाइन शिक्षक विकास मंच सुरू केला आहे.

राज्यात करोना प्रादुर्भाव वाढत आहे. काही महिने लॉकडाऊनही होते. खबरदारीचा उपाय म्हणून अद्यापही शाळा बंदच आहेत. 15 जूनपासून शैक्षणिक वर्ष सुरू झाले असून ऑनलाइन शिक्षणाला प्राधान्य देण्यात आले आहे. ऑनलाइन प्रशिक्षणामधून शिक्षकांचे सक्षमीकरण होत आहे.

शाळा बंद असल्या तरी राज्यातील अनेक शिक्षक वाड्या, वस्त्या, शहरी व दुर्गम भागांत स्वयंप्रेरणेने मुलांचे शिक्षण सुरू राहण्यासाठी प्रयत्न करीत आहे. याची दखल घेऊनच ऑनलाइन शिक्षक विकास मंच सुरू केला आहे. यासाठी जिल्ह्यातील उत्कृष्ट काम करणाऱ्या शिक्षकांचे सादरीकरण जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थांमार्फत घेण्यात येणार आहे. त्यातील उत्कृष्ट काम करणाऱ्या शिक्षकांची माहिती ई-मेल सादर करण्याच्या सूचनाही दिल्या होत्या.

याबाबतचे आदेश विद्या प्राधिकरणाचे संचालक दिनकर पाटील यांनी विभागीय शिक्षण उपसंचालक, जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थांचे प्राचार्य, प्राथमिक व माध्यमिक शिक्षणाधिकारी, शिक्षण निरीक्षक यांना दिल्या.

Leave A Reply

Your email address will not be published.