चंद्रपूर- ऑनलाईन मोबाईल खरेदीत कंपनीने मोबईल ऐवजी बिनकामाच्या वस्तू पाठवल्या. या पाहून मानसिक तणावात येत 18 वर्षीय तरुणाने विहीरीत उडी घेऊन आत्महत्या केली, ही धक्कादायक घटना चंद्रपूर जिल्ह्यात घडली आहे.
भिसी अप्पर तालुक्या अंतर्गत येणाऱ्या पूयारदंड येथील रोहित राजेंद्र जांभुळे (वय१८) वर्षे या युवकाने काही दिवसांपूर्वी ऑनलाईन मोबाईल बुक केला होता. त्याची मूळ किंमत १५हजार रुपये होती व त्यासाठी त्याने १० हजार रुपये त्या कंपनीला ऑनलाईनच्या माध्यमातून दिले होते . उर्वरित ५हजार रुपये मोबाईल पार्सल आल्यानंतर पोस्ट मार्फत पार्सल स्वीकारून पोस्ट विभागाला देऊन पार्सल घ्यायचे होते.
यासाठी युवकाला पोस्टातून फोन आला. पोस्टातील सर्व प्रक्रिया पूर्ण करून कंपनीने पाठविलेले पार्सल आईने व मुला न खोलून पाहिले तर त्या पार्सल मध्ये मोबाईल ऐवजी २ पॉकेट, १ बेल्ट व खाली पुठ्ठा अशा बिनकामी वस्तू होत्या.