पुणे – जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळा सुरू होण्याबाबत अद्याप कोणताही निर्णय झालेला नाही. त्यामुळे आदेश येईपर्यंत जिल्हा परिषदेच्या सर्व शाळा ऑनालाइनच सुरू राहणार आहेत.
नववी ते बारावीपर्यंतच्या शाळा सुरू करण्याचा निर्णय राज्य शासनाने जाहीर केला आहे. त्याची मार्गदर्शक नियमावली तयार झाली. मात्र, पुणे जिल्हा परिषदेच्या सर्व शाळा या प्राथमिक असून, माध्यमिक एकही नाही.
त्यामुळे जिल्हा परिषदेच्या शाळा या नेहमीप्रमाणे ऑनलाइनच भरणार असल्याची माहिती प्राथमिक शिक्षणाधिकारी सुनील कुऱ्हाडे यांनी दिली. दरम्यान, पुढील दोन दिवसांत करोना संसर्ग स्थिती काय असेल, याचा विचार करून शाळा सुरू करायच्या की नाही याबाबत निर्णय घेतला जाणार आहे.