अकरावी प्रवेशासाठी महाविद्यालयांची ऑनलाइन नोंदणी

पुणे  -पुणे व पिंपरी-चिंचवड महापालिका क्षेत्रांतील इयत्ता अकरावी प्रवेश प्रक्रिया केंद्रीय ऑनलाइन पद्धतीने होणार आहे. यासाठी कनिष्ठ महाविद्यालयांना ऑनलाइन नोंदणी करावी लागणार असून त्यासाठी संकेतस्थळावर सुविधा उपलब्ध झाली आहे. अकरावी प्रवेश प्रक्रियेच्या वेळापत्रकाची अंमलबजावणी सुरू झाली आहे.

पहिल्या टप्प्यात कनिष्ठ महाविद्यालयांची रविवारपासून नोंदणी सुरू झाली. महाविद्यालयांनी भरलेल्या माहितीची विभागीय शिक्षण उपसंचालकांकडून पडताळणी होणार आहे. 9 ऑगस्टपासून विद्यार्थ्यांना ऑनलाइन नोंदणी करून प्रवेश अर्जाचा भाग-1 भरता येणार आहे. अर्जाचा भाग-2 भरण्याबाबत नंतर सूचना जारी करण्यात येणार आहे.

दरम्यान, माहितीत बदल करावयाचा असल्यास ई-मेलद्वारे कळवावे लागणार आहे. त्यानंतरच बदल करता येणार आहे, अशी माहिती पुणे विभागीय शिक्षण उपसंचालक, कार्यालयातील सहायक संचालक तथा इयत्ता अकरावी केंद्रीय प्रवेश प्रक्रियेच्या सदस्य सचिव मीना शेंडकर यांनी दिली.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.