पिंपळे गुरव – करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीदिनी घरी राहूनच अभिवादन करायचे आहे. कोणीही बाहेर येऊ नये, असे आवाहन दापोडीतील बुद्ध विहार संघाच्या वतीने करण्यात आले आहे.
14 एप्रिलला सकाळी घरीच राहून ध्यान करावे. तसेच धम्मचारी नागसेतू ऑनलाइन ध्यानाची माहिती देतील. तसेच सकाळी 11.10 ला धम्मचारी मैत्री वीर नागार्जुन यांचे प्रवचन होईल. नंतर 12.30 ला बाबासाहेब आंबेडकर यांच्यावरील गीते. दुपारी दोनला धम्म या ग्रंथाचे वाचन. 4 वाजता धम्मप्रवचन व अमृतसिद्धी अशा ऑनलाइन कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.