पुणे – केंद्र सरकारच्या विविध योजना देशपातळीवर राबविल्या जातात. मात्र, या योजनांची अंमलबजावणी ठरवलेल्या निकषांच्या आधारावर होते, की नाही हे पाहणे महत्त्वाचे असते. आता या अंमलबजावणीची देखरेख करण्यासाठी ऑनलाइन यंत्रणा विकसित करण्यात आलेली आहे.
माहिती तंत्रज्ञान विभागाने ऑटोमोटिव्ह रिअल टाइम परफॉर्मन्स स्मार्ट बोर्ड सुरू केलेला आहे. त्यामुळे केंद्राच्या राज्य आणि जिल्हा पातळीवरील योजनांचा ऑनलाइन आढावा घेणे सोपे जाणार आहे. जिल्हास्तरावरील योजनांच्या आकडेवारीचे एकत्रित संकलन आणि विश्लेषण या यंत्रणेद्वारे केले जाणार आहे.