सायबर चोरट्याचा फायनांन्सरला ५० लाखांचा गंडा

सीमकार्ड स्वत:च्या नावावर घेऊन २८ खात्यात पैसे केले वर्ग

पुणे – शहरातील एका फायनांन्सरला सायबर चोरट्याने ५० लाखांचा गंडा घातला आहे. अवघ्या तीन दिवसात विविध २८ बॅंक खात्यात त्याने हे पैसे वर्ग केले आहे. विशेष म्हणजे फायनांन्सरचा बॅंक खात्याला कनेक्‍ट असलेला नंबर बंद करुन तोच नंबर बनएवट कागदपत्राच्या आधारे स्वत: घेत ही फसवणूक करण्यात आली आहे.

अजित प्रल्हाद काळे(39,रा.लोणीकाळभोर) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार अज्ञात व्यक्तीविरुध्द खडक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फिर्यादी यांचा स्वत:चा फायनांन्सचा व्यवसाय आहे. यानिमीत्त त्यांनी बॅंकेत उघडलेल्या खात्याला मोबाईल नंबर जोडला आहे. हा मोबाईल नंबर आरोपीने बंद करुन आयडीया कंपनीकडे बनावट कागदपत्रे सादर करुन नवीन सीम कार्ड घेतले. यानंतर फिर्यादीच्या बॅंक खात्यातून त्याने तब्बल 50 लाख रुपये विविध 28 खात्यांमध्ये ऑनलाईन पद्धतीने वर्ग केले.

फिर्यादी हे 26 नोव्हेंबर रोजी गाडीने मुंबईला जात होते, तेव्हा त्यांच्या मोबाईलचे सीमकार्ड अचानक बंद पडले. काही तांत्रिक कारणामुळे हे घडले असावे असे त्यांना वाटले. यानंतर दुसऱ्या दिवसी त्यांना मोबाईलवर काही ओटीपीचे एसएमएस आणि बॅंक खात्यातून पैसे काढल्याचे एसएमएस आले. यानंतर त्यांनी बॅंकेत धाव घेत खात्यातील रक्कम तपासली असता ऑनलाईन फसवणूक झाल्याचे लक्षात आले. या प्रकरणाचा तपास पोलीस निरीक्षक उत्तम चक्रे करत आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.