- अतिरिक्त आयुक्त रुबल अग्रवाल यांची माहिती
पुणे – करोनामुळे शहरातील शाळा अद्यापही बंद आहेत. दिवाळीपर्यंत तरी त्या बंदच राहतील, असे सूतोवाच मिळत आहेत.
परंतु, शाळा बंद, पण शिक्षण चालू ही मोहिम सुरूच असून यापुढेही सुरू राहील, अशी माहिती पुणे महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्त रुबल अग्रवाल यांनी दिली.
महापालिकेच्या शिक्षण विभागाच्या वतीने विद्यार्थ्यांना एड्यू मित्र ऍप, दीक्षा ऍप, मीट, झूम, व्हॉट्स ऍप, आदी माध्यमातून ऑनलाइन तर प्रत्यक्ष फोन कॉल, एसएमएस, एकात्मिक स्वाध्याय पुस्तिका आदी ऑफलाइन शिक्षण सुरू असल्याचेही अग्रवाल यांनी नमूद केले.