कोल्हापूर /प्रतिनिधी- कोल्हापूर महानगरपालिकेच्या शाळामधूनही कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आता ऑनलाईन अर्थात व्हर्च्युअल क्लासव्दारे विद्यार्थ्यांना शिक्षण दिले जात आहे, त्यामध्ये महानगरपालिकेच्या फुलेवाडी येथील महात्मा फुले विद्यालयाने ऑनलाईन शिक्षणामध्ये आघाडी घेऊन ऑनलाईन शिक्षणाचा फुलेवाडी पॅटर्न निर्माण केला. शाळेच्या मुख्याद्यापिका सौ. सुनंदा पाटील यांनी ऑनलाईन शिक्षणासाठी समयबध्द नियोजन केले.
कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर ऑनलाईन शिक्षणास पर्याय नव्हता, त्यामुळे महानगरपालिकेच्या प्राथमिक शिक्षण समितीने पुढाकार घेऊन महानगरपालिकेच्या शाळामधून व्हर्च्युअल क्लासव्दारे विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिक्षण देण्यावर भर दिला. त्यामुळे सर्वच शाळामध्येही आता व्हर्च्युअल क्लासची निर्मिती झाली असून सर्व शिक्षकानी लर्न फ्रॉम होम याव्दारे जुन ते ऑक्टोंबर यां पाच महिन्यासाठी आभ्यासावर आधारित व्हीडीओ तयार करुन वॉटसॲपच्या सहायाने विद्यार्थ्यांशी संवाद साधला. ऑनलाईन शिक्षणाच्या या उपक्रमास महापौर सौ. निलोफर आजरेकर, +ɪÉÖHò b÷Éì. EòÉnÆù¤É®úÒ ¤É±ÉEò´Ébä÷, प्राथमिक शिक्षण समितीचे सभापती श्रावण फडतारे, प्रशासन अधिकारी शंकर यादव यांचे प्रोत्साहन लाभले.
काळाजी पाऊले ओळखून फुलेवाडी येथील महात्मा फुले विद्यालयाने ऑनलाईन शिक्षणामध्ये सुरुवातीपासून आघाडी घेऊन ऑनलाईन शिक्षणाचा फुलेवाडी पॅटर्न निर्माण केला आहे. पहिली ते सातवीच्या 536 विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिक्षण दिले. कोरोना आणि लॉकडाऊन यामुळे विद्यार्थी शिक्षणापासुन वंचित राहू नये यासाठी शैक्षणिक पर्यवेक्षक विजय माळी आणि मुख्याद्यापिका सौ. सुनंदा पाटील यानी सर्व शिक्षकांच्या सहकार्याने ऑनलाईन शिक्षणाचं नवं दालन सुरु केल. नोव्हेंबर आणि सहामाही परिक्षेचेही गुगल फॉर्मव्दारे ऑनलाईन नियोजन करण्यात आल्याचेही मुख्याद्यापिका सौ. सुनंदा पाटील यानी सांगितले.
शिक्षण सत्राच्या पहिल्या पाच महिन्यासाठी इयत्ता निहाय तयार करण्यात आलेल्या व्हीडीओव्दारे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करुन त्यांच्या शंकांचे निरसन करण्याबरोबरच कृतियुक्त अभ्यास आणि विविध सहशालेय उपक्रमाचे ऑनलाईन आयोजन केले. शहरस्तरीय ऑनलाईन शिक्षण परिषद गुगल मिटच्या माध्यमातून आयेाजन केले गेले. याबरोबरच शाळेतील सर्व शिक्षक गुगल मिट झुम ॲप वेबेक्स व्दारे 15 दिवसातून वर्गस्तरीय ऑनलाईन पालक सभेव्दारे विद्यार्थ्यांच्या अभ्यासावर चर्चा घडवून आणली.
ऑनलाईन शिक्षणाचा फुलेवाडी पॅटर्न निर्माण करण्यामध्ये सर्वच मान्यवरांसह शिक्षक-शिक्षिकामध्ये सुनंदा पाटील, संतोष आंबेकर,उत्तम वाईंगडे, कुलदीप जठार, तुषार भापकर, आनंदा पाटील, स्वाती चौगले,माधुरी चिंचणे, शरद पाटील, जाहेर शेख, शशिकंत कांबळे, कृष्णात यादव, माधुरी मातले, स्नेहा पाटील आणि उत्तम पाटील महत्वपूर्ण योगदान लाभल्याचे मुख्याद्यापिका सौ. सुनंदा पाटील यांनी सांगितले.