पिंपरी – गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांच्या निधनाच्या दुखवट्यानिमित्त राज्य सरकारने सोमवारी सार्वजनिक सुट्टी जाहीर केली. त्यामुळे शहरातील शाळा बंद होत्या. तथापि, काही शाळांनी ऑनलाइन वर्ग घेतले.
शहरामध्ये 1 फेब्रुवारीपासून सर्व माध्यमांच्या शाळांमधील पहिली ते आठवीचे वर्ग अर्ध सत्र कालावधीत सुरू करण्यास आयुक्त राजेश पाटील यांनी परवानगी दिली. तर, नववी ते बारावीचे वर्ग नियमित सुरू करण्यास परवानगी देण्यात आली. त्यानुसार शाळा सुरू झाल्या. दरम्यान, आयुक्तांनी नवे आदेश काढत सोमवारपासून (दि. 7) पहिली ते आठवीचे वर्ग पूर्णवेळ सुरू करण्यास परवानगी दिली. त्यानुसार आजपासून पूर्णवेळ वर्ग सुरू होणार होते. तथापि, गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांच्या निधनाच्या दुखवट्यानिमित्त राज्य सरकारने सार्वजनिक सुट्टी जाहीर केल्याने ऑफलाइन शाळा आज बंद होत्या. तथापि, काही शाळा ऑनलाइन सुरू ठेवण्यात आल्या होत्या.