बारामती( प्रतिनिधी): शिवनगर विद्या प्रसारक मंडळाच्या अभियांत्रिकी महाविद्यालयाने कोरोनामुळे उद्भभवलेल्या लॉकडाऊनच्या काळात विद्यार्थ्यांना ऑनलाइनद्वारे टीचींग-लर्निंग (अध्यापन- अध्ययन पध्दती) चा वापर व ट्रेनिंगचा ( प्रशिक्षण ) उपक्रम सुरु केला आहे.लॉकडाऊननंतर येणाऱ्या आव्हानांना आत्मविश्वासाने सामोरे जाण्यासाठी महाविद्यालयामार्फत विद्यार्थ्यांना ऑनलाइन माध्यमांच्याद्वारे विविध विषयांवर आधारित उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
ऑनलाइन व्हिडिओ लेक्चर , गुगल व्हर्च्युअल क्लास रुम, व्हर्च्युअल लॅब, झुम अॅपद्वारे इंडस्ट्रीतील नामांकित व तज्ज्ञ वक्त्यांचे विविध विषयावर जसे आर्टीफिशिअल इंटिलिजनस , मशीन लर्निंग ,डेटा सायन्स ,कम्युनिकेशन स्किल्स ,चॅलेंजेस आफ्टर लॉकडाऊन ,पायथॉन ,प्रोग्रॅमिंग लँग्वेजेस इत्यादी अद्ययावत विषयावर सेमिनारचे आयोजन व मार्गदर्शन , टेस्ट सेरीज , असाइनमेंटस इत्यादींचा त्यामध्ये समावेश आहे.तसेच महाविद्यालयामार्फत विद्यार्थी व प्राध्यापक यांच्यासाठी विविध विषयांवर आधारित फ्री-सर्टिफिकेशन कोर्सेसचेही आयोजन करण्यात येत आहेत.
महाविद्यालयातील प्राध्यापक वेळोवेळी झुम व युट्यूब या माध्यमांद्वारे विद्यार्थ्यांशी संवाद साधून त्यांच्या शंकांचे निरसन व मार्गदर्शन करत आहेत.तसेच भविष्यात येणाऱ्या कॅम्पस प्लेसमेंट ड्राईव्हला सामोरे जाण्यासाठी व विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी फेस कॅम्पस कॅप्सूल ऑनलाइन ट्रेनिंग ,फ्यूल व नॅसकॉम अंतर्गत विविध टेक्निकल कोर्सेसचे आयोजन , टीसीएस डिजिटल कोर्सेसचे आयोजन करण्यात येत असल्याची माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस एम मुकणे यांनी दिली. महाविद्यालयाचे डॉ. माधव राऊळ तसेच विविध विभाग प्रमुख व विषय शिक्षक विद्यार्थ्यांना जास्तीत जास्त ऑनलाइन कोर्सेस उपलब्ध करून स्किल अपग्रेडेशन करण्यासाठी प्रवृत्त करत आहेत .