अकरावी ऑनलाइन वर्ग पुन्हा सुरू

विद्यार्थ्यांना आवश्‍यक ते मार्गदर्शन मिळावे यादृष्टीने अकरावीसाठी ऑनलाइन वर्ग

 

पुणे – विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये, यासाठी राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेने अकरावी वर्गासाठी ऑनलाइन वर्ग सुरू केले आहे. दिवाळी सुट्टीमुळे हे वर्ग थांबवले होते. आता पुन्हा गुरुवारपासून ऑनलाइन तासिका सुरू झाल्याची माहिती शालेय शिक्षण विभागाकडून देण्यात आली.

अकरावीच्या कला, वाणिज्य, विज्ञान शाखेच्या मराठी व इंग्रजी माध्यमासाठी ऑनलाइन (झूम व युट्युब लाइव्ह) या माध्यमांच्या सहाय्याने तासिका दि. 2 नोव्हेंबरपासून सुरू केल्या होत्या. त्याचा राज्यातील विद्यार्थ्यांना फायदा होत आहे.

प्रवेशप्रक्रिया सुरू असल्याने घरी राहूनदेखील या विद्यार्थ्यांना आवश्‍यक ते मार्गदर्शन मिळावे यादृष्टीने राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेने अकरावीसाठी वर्ग सुरू केले आहेत. त्यांना तज्ज्ञ शिक्षकांचे मार्गदर्शन हे सकाळी 8:40 ते 10:40 या वेळेमध्ये लाइव्ह केले जात आहे.

दिनांक 11 नोव्हेंबरपासून दीपावलीच्या सुट्ट्यांमुळे तसेच तज्ज्ञ मार्गदर्शक शिक्षकांच्या इतर शालेय कामकाजामुळे दि. 2 डिसेंबरपर्यंत तासिकांचे लाइव्ह प्रक्षेपण थांबविण्यात आले होते. तथापि सदरचे प्रक्षेपण पुनश्‍चः तीनही शाखांसाठी तासिका सुरू केले आहे. या सर्व दैनिक तासिकांचे तपशीलवार वेळापत्रक राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेच्या https://covid19.scertmaha.ac.in/eleventh या लिंकवर उपलब्ध आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.