ऑनलाइन दस्तनोंदणी 24 तासात व्हावी; असोसिएशन ऑफ रिअल इस्टेट एजंटची मागणी

पुणे – ऑन लाईन लिव्ह ऍड लायसंन्स रजिस्टर होण्याचा कालावधी जास्तीत जास्त 24 तासांचा हवा. हा कालावधी सध्या 2 ते 30 दिवसांपर्यंत जात आहे. तो कमी करण्यात यावा अशी मागणी असोसिएशन ऑफ रिअल इस्टेट एजंटच्यावतीने करण्यात आली आहे.

पुणे शहरात ऑनलाईन लिव्ह ऍन्ड लायसन (भाडेकरार नोंद) घेणाऱ्यांची संख्या जास्त आहे. ज्येष्ठ नागरिक महिला व सर्वसामान्य दस्त नोंदणीसाठी सब्रजिस्टर कार्यालयात न जाता घरपोच नोंदणीची अधिकृत सेवा पुरवठादार यांच्या माध्यमातून घेतात.

नोंदणी व मुद्रांक शुल्क विभागाची ऑनलाईन सेवा दर माफक असल्याने नोंदवून घेणाऱ्यांची संख्या गेल्या तीन ते चार वर्षात वाढली आहे. यामुळे शासनाचे उत्पन्न हजारो कोटीने वाढले. हे करत असताना पुणे शहरातील 1 ते 28 सब रजिस्टर कार्यालयात हे दस्त ऑनलाइन पद्धतीने जाऊन रजिस्टर्ड करत असतात.

महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियंम 2015 सेवा हमी कायद्यानुसार ऑनलाईन दस्त नोंदवलेले दुय्यम निबंधकास प्राप्त झाल्यानंतर त्यादिवशी स्वीकारून नोंदणी करणे व त्यातील काही त्रुटी असल्यास परत पाठवून देणे आवश्‍यक आहे. मात्र असे असले तरी दस्त नोंदणीसाठी हा कालावधी 2 दिवस ते 30 दिवसापर्यंत येत आहे.

हा दस्तनोंदणी कालावधी 24 तासांचच असावा अशी मागणी असल्याचे असोसिएशन ऑफ रिअल इस्टेट एजंटच्यावतीने अध्यक्ष सचिन शिंगवी यांनी पत्रा द्वारे सह जिल्हा निबंधक ह्यांना तसेच प्रत्यक्ष भेटून उप महानिरीक्षक (संगणक) मापारी यांच्याकडे केली आहे.

दस्तनोंदणीत 1009 एरर, फ्लॅश प्लेयर बंद, अश्‍या इतर समस्या बाबत सुद्धा मापारी यांच्याशी चर्चा करण्यात आली. त्यांनी लवकरच सर्व अडचणी चे निराकरण करण्यात येईल असे आश्वासन दिले. सेवा पुरवठादार ह्याच्या वतीने ओंकार मिरजकर, शुभम घोरपडे, हरिदास मेरूकर, अभिषेक सुकाळे ,आकाश तांबडे ,मंगेश पाटील ,विकास पडावे ,योगेश पनपालिया इत्यादी उपस्थित होते.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.