ओंकारची विजयी सलामी

पुणे: आदर पूनावाला महाराष्ट्र टेनिस अकादमी (एपीएमटीए) व डेक्कन जिमखाना यांच्या संलग्नतेने आयोजित एमएसएलटीए योनेक्‍स सनराईज अखिल भारतीय मानांकन चॅम्पियनशिप सिरिज 14 वर्षाखालील टेनिस स्पर्धेत विश्वजीत सणस, अभय नागराजन, ओंकार शिंदे यांनी आपापल्या प्रतिस्पर्ध्यांचा पराभव करून विजयी सलामी दिली.

डेक्कन जिमखाना येथील टेनिस कोर्ट येथे सुरू झालेल्या या स्पर्धेत पहिल्या फेरीत मुलांच्या गटात विश्वजीत सणस याने आदित्य रानवडे टायब्रेकमध्ये 8-7 (4) असा पराभव करून आगेकूच केली. अभय नागराजन याने अनुज कदमचा 8-2 असा तर, सौमिल चोपडे याने देवांशीश कोळंबेकरचा 8-6 असा पराभव करून विजयी सलामी दिली.

ओंकार शिंदे याने श्‍लोक गांधीला 8-2 असे पराभूत केले. आदित्य यादव व अभिराम निलाखे यांनी अनुक्रमे ध्रुव साळुंखे व अद्विक नाटेकर यांचा 8-4 अशा सारख्याच फरकाने पराभव करून दुसरी फेरी गाठली. या स्पर्धेत ओंकारबरोबर अभय, विश्‍वजीत यांनी पहिल्या फेरीतील विजयी सलामीमुळे विजेतेपदाची दावेदारी दाखवून दिली आहे.

स्पर्धेचा निकाल
पहिली फेरी : 14 वर्षाखालील मुले :
कार्तिक नारकर वि.वि.अंकित राय 8-4; विश्वजीत सणस वि.वि.आदित्य रानवडे 8-7(4); अभय नागराजन वि.वि.अनुज कदम 8-2; सौमिल चोपडे वि.वि.देवांशीश कोळंबेकर 8-6; लक्ष गुजराथी वि.वि.आदित्य आयंगर 8-4; केशव नाहाटा वि.वि.ऋषिकेश बर्वे 8-4; अद्वैत भातखंडे वि.वि.अर्णव बनसोडे 8-6; ओंकार शिंदे वि.वि.श्‍लोक गांधी 8-2; आदित्य यादव वि.वि.ध्रुव साळुंखे 8-4; अभिराम निलाखे वि.वि.अद्विक नाटेकर 8-4.

Leave A Reply

Your email address will not be published.