केंद्र शासनाकडून कांदा साठवणुकीवर निर्बंध लागू

नगर – केंद्र शासनाने दिनांक 29 सप्टेंबर 2019 च्या अधिसूचनेनुसार जीवनावश्‍यक अधिनियम 1955 अंतर्गत कांदा या जीवनावश्‍यक वस्तूवर लागू असलेले साठवणुकीवर निर्बंध लागू करण्यात आलेले आहेत. त्यानुसार व्यापारासाठी 50 मे.टन व किरकोळ व्यापाऱ्यासाठी 10 मे.टन कांदयासाठी निर्बंध लागू करण्यात आले आहेत.

आता केंद्र शासनाने दिनांक 3 डिसेंबर 2019 च्या अधिसूचनेनुसार घाऊक व्यापारासाठी 25 मे.टन व किरकोळ व्यापाराकरिता 5 मे. टन कांद्यासाठी निर्बंध लागू केले आहेत. त्यानुसार शासनाच्या दिनांक 6 डिसेंबर 2019 रोजीच्या आदेशान्वये घाऊक व्यापाऱ्यासाठी 25 मे.टन व किरकोळ व्यापाऱ्यासाठी 5 मे.टन कांद्यासाठी साठा निर्बंध लागू करण्यात आलेले असून या कांदा निर्बंधाची मुदत पुढील आदेशापर्यत वाढविण्यात आलेली आहे.

जिल्हयात नागरिकांना आवाहन करण्यात आले की कोठेही अशा प्रकारे बेकायदेशीर साठेबाजी निदर्शनास आल्यास जिल्हाधिकारी कार्यालय, पुरवठा विभाग, वर संपर्क साधावा. बेकायदा साठेबाजीचा व्यापार करणाऱ्या व्यापाऱ्याविरुद्ध जीवनावश्‍यक वस्तू अधिनियम 1955 व काळा बाजार प्रतिबंध आणि जीवनावश्‍यक वस्तूंचा सुरळीत पुरवठा अधिनियम 1980 अंतर्गत कठोर कार्यवाही करण्यात येईल, असे जिल्हा पुरवठा अधिकारी, यांनी कळविले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.