लोणंद – लोणंद कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात गुरुवारी 500 हळवा/ गरवा कांदा पिशवीची आवक झाली. तर कांद्याचे दर 3700/- पर्यंत तेजीत निघाले असल्याची माहिती सभापती राजेंद्र तांबे व उपसभापती दत्तात्रय बिचुकले यांनी दिली.
भुसार बाजारात ज्वारी 2800/-, बाजरी 2300/-, गहू 2300/- पर्यंत दर निघाले. शेतकऱ्यांनी आपला माल चांगला वाळवून व निवडून विक्रीसाठी लोणंद कृषी उत्पन्न बाजार समितीत आणावा, असे आवाहन बाजार समितीचे सचिव विठ्ठल सपकाळ यांनी केले.लोणंद बाजार समितीच्या कांदा बाजारात कांदा नंबर 1 – रुपये 3000 ते 3700, कांदा नंबर 2- रुपये 2000 ते 3000, कांदा गोल्टी 1200 ते 2000 पर्यंत दर निघाले होते. भुसार बाजारात ज्वारी 2450 ते 2800 (आवक 25 पोती), बाजरी 1950 ते 2300 (आवक 30 पोती), गहू 1900 ते 2300 (आवक 20 पोती) पर्यंत दर निघाले होते. जनावरे बाजारात बैल 14000 ते 60000 (आवक 15 नग), गाय 20000 ते 65000 (आवक 25 नग), शेळ्या 3200 ते 14000 (आवक 2700 नग), मेंढ्या 3000 ते 13000 (आवक 3100 नग) तर वैरण बाजारात कडवळ 1250/- अशा प्रकारे बाजारभाव लोणंद बाजारात राहिले.