पाटणा – बिहारमधील एका सामाजिक कार्यकर्त्याने कांद्याचे दर गगनाला भिडल्याचा विषय थेट न्यायालयात नेला आहे. त्या कार्यकर्त्याने न्यायालयात धाव घेऊन केंद्रीय अन्न आणि ग्राहक व्यवहार मंत्री रामविलास पासवान यांच्या विरोधात तक्रार दाखल केली आहे.
एम.राजू नय्यर या सामाजिक कार्यकर्त्याने मुझफ्फरपूर दिवाणी न्यायालयात दाखल केलेल्या तक्रारीवर 12 डिसेंबरला सुनावणी होणार आहे. कांदा दरवाढ रोखण्यात पासवान यांना अपयश आले आहे. त्या विषयावरून ते जनतेची दिशाभूल करत आहेत.
काळा बाजार होत असल्याने दर वाढल्याचा दावा पासवान करत आहेत, असा आरोप नय्यर यांनी केला आहे. आता संबंधित प्रकरणावरील सुनावणी चर्चेचा आणि औत्सुक्याचा विषय ठरण्याची चिन्हे आहेत.