पुरंदरच्या पूर्व भागात कांदा लागवडीस वेग

नायगाव- यंदा पावसाचे प्रमाण वाढल्याने विहिरी, तलाव भरलेले आहेत. त्यामुळे पुरंदरच्या पूर्व भागात रब्बी हंगामातील पिके घेण्याचा भर वाढला आहे. सद्या कांद्याचे भाव दिवसेंदिवस वाढत चालले आहेत. पाण्याची उपलब्धता वाढली आहे. त्यामुळे शेतकरी मोठ्या प्रमाणावर जिरायती कांदा लागवड करीत आहे.

नायगाव(ता.पुरंदर) परिसरात रब्बी हंगामातील ज्वारी पीक शेतकरी घेत असतात; परंतु चालू वर्षी पाऊस खूप पडला. त्यामुळे जिरायती शेतीत पीक घेण्यासाठी विहिरी पूर्ण भरल्या आहेत. कांदा पिकाला शेतकऱ्यांनी जास्त पसंती दिली असल्याचे दिसून येत आहे. यंदा अतिवृष्टीमुळे अनेक पिके वाया गेल्याने येथील शेतकरी कांदा लागवडीकडे वळले आहेत. सध्याला 3 फूट रुंदीच्या व तीस फूट लांबीच्या वाफ्यातील कांदा रोपाचे दर 4 ते 5 हजार रुपये बाजारभाव मिळत आहे. पुरंदरच्या पूर्व भागात ज्वारी पिकाची पेरणी जात प्रमाणात झाली असून कांदा पिकाची लागवड ही मोठ्या प्रमाणात केली जात आहे. भविष्यात पाण्याची अडचण निर्माण होऊ नये, यासाठी आत्ताच शेतकऱ्यांनी ठिबक सिंचनद्वारे कांदा लागवड करणे गरजेचे आहे.

तीनशे रुपये प्रति मजूर देऊन कांदा लागवड केली जाते. बियाणे, खते, औषधे व किरकोळ खर्च मिळून एकरी 20 हजार पेक्षा जास्त खर्च येत असून नाईलाजास्तव लागवड करावी लागत आहे. फोटो-

Leave A Reply

Your email address will not be published.