कांद्याची घसरण सुरू

चाकण बाजारभाव ः हिरवी मिरची, टोमॅटो व लसणाचे भाव तेजीत

महाळुंगे इंगळे- खेड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या चाकण येथील महात्मा फुले मार्केट यार्डमध्ये कांदा, बटाटा, जळगाव भुईमूग शेंगा, हिरवी मिरची व टोमॅटोची किरकोळ आवक झाली. लसूण, कोबी, वांगी व भेंडीची या आठवड्यात विक्रमी आवक झाली. हिरवी मिरची, टोमॅटो, फ्लॉवर व लसणाचे भाव तेजीत राहिले. पालेभाज्याच्या बाजारात मेथी व कोथिंबीरीची भरपूर आवक झाली, तर शेपू व पालक भाजीची आवक घटली. जनावरांच्या बाजारात जर्शी गाई, बैल व शेळ्यां मेंढ्याच्या संख्येत घट झाली. तर म्हशींच्या संख्येत मोठी वाढ झाली. एकूण उलाढाल 3 कोटी, 10 लाख रुपये झाली.
चाकण बाजारात कांद्याची एकूण 1,160 क्विंटल आवक झाली.

गेल्या शनिवारच्या तुलनेत ही आवक 90 क्विंटलने घटून भावात 1,500 रुपयांची घट झाली. कांद्याचा कमाल भाव 9 हजार 500 रुपयांवरून 8 हजार रुपयांवर स्थिरावला. तळेगाव बटाट्याची एकूण आवक 1,700 क्विंटल झाली. गेल्या शनिवारच्या तुलनेत ही आवक 9 क्विंटलने वाढल्याने भावात 500 रुपयांची घट झाली. बटाट्याचा कमाल भाव 2 हजार 200 रुपयांवरून 1 हजार 700 रुपयांवर स्थिरावला. जळगाव भुईमूग शेंगांची एकूण आवक 4 क्विंटल झाली. ही आवक 3 क्विंटलने घटूनही भावात 200 रुपयांची घट झाली. या शेंगांचा कमाल भाव 7 हजार रुपयां वरुन 6 हजार, 800 रुपयांवर स्थिरावला. लसणाची एकूण आवक 5 क्विंटल झाली. गेल्या आठवड्याच्या तुलनेत ही आवक 1 क्विंटलने वाढूनही भावात 1 हजार रुपयांची वाढ झाली. लसणाचा कमाल भाव 15 हजार रुपयांवर पोहोचला.

चाकण बाजारात हिरव्या मिरचीची एकूण आवक 472 क्विंटल झाली. गेल्या शनिवारच्या तुलनेत ही आवक 8 क्विंटलने घटल्याने भावात मोठी वाढ झाली. हिरव्या मिरचीला 2 हजार ते 3 हजार रुपये असा कमाल भाव मिळाला.

 • शेतीमालाची आवक व बाजारभाव प्रतिक्‍विंटल
  कांदा
  आवक- 1160 क्विंटल
  क्रमांक 1- 8000 रुपये
  क्रमांक 2- 6000 रुपये
  क्रमांक 3- 3000 रुपये
  बटाटा
  आवक – 1700 क्विंटल
  क्रमांक 1- 1700 रुपये
  क्रमांक 2- 1500 रुपये
  क्रमांक 3- 1200 रुपये
 • फळभाज्या – एकूण आवक डागांमध्ये व कंसात प्रती क्विंटलसाठी मिळालेले भाव रुपयांमध्ये
  टोमॅटो – 1,150 पेट्या (800 ते 1200), कोबी – 445 पोती (600 ते 1000), फ्लॉवर – 290 पोती (1000 ते 1500), वांगी – 670 पोती (2000 ते 3000), भेंडी – 450 पोती (2500 ते 3500), दोडका – 295 पोती (3000 ते 4000), कारली – 265 डाग (2000 ते 3000), दुधीभोपळा – 342 पोती (600 ते 1200), काकडी – 442 पोती (1000 ते 1500), फरशी – 195 पोती (1000 ते 2000), वालवड – 268 पोती (2000 ते 3000), गवार – 275 पोती (4000 ते 5000), ढोबळी मिरची – 442 डाग (1500 ते 2500), चवळी – 232 पोती (1500 ते 2500), वाटाणा – 945 पोती (2000 ते 3000), शेवगा – 32 पोती (6000 ते 8000), गाजर – 245 पोती (2000 ते 3000 रुपये)
 • जनावरे – चाकण येथील जनावरांच्या बाजारात विक्रीसाठी आलेल्या 105 जर्श्री गायींपैकी 84 गायींची विक्री झाली. (10,000 ते 60,000 रुपये), 145 बैलांपैकी 82 बैलांची विक्री झाली. (10,000 ते 35,000 रुपये), 165 म्हशींपैकी 145 म्हशींची विक्री झाली. (20,000 ते 60,000 रुपये), शेळ्या – मेंढ्यांच्या बाजारात विक्रीसाठी आलेल्या 5,240 शेळ्या – मेंढ्यापैकी 4,827 मेंढ्यांची विक्री होऊन त्यांना 1,200 ते 10,000 रुपये इतका भाव मिळाला.

Leave A Reply

Your email address will not be published.