पुणे – अतिवृष्टीमुळे राज्यातील नवीन कांदा पिकाचे झालेले नुकसान…तुलनेने कमी प्रमाणात उपलब्ध असलेला जुना कांदा…परराज्यातून असलेल्या मागणीमुळे कांद्याचे भाव कडाडले आहेत.
परिस्थिती पाहता डिसेंबरपर्यंत कांदा तेजीत राहणार असल्याचा अंदाज मार्केट यार्डातील व्यापारी रितेश पोमण यांनी वर्तविला आहे.
सध्या घाऊक बाजारात नवीन कांद्याला किलोस 10 ते 30 रुपये, तर जुन्या कांद्यास 30 ते 40 रुपये भाव मिळत आहे.
दर्जानुसार 50 ते 80 रुपये किलो भावाने किरकोळ बाजारात कांद्याची विक्री होत आहे. दोन महिन्यांपूर्वी कांद्याची घाऊक बाजारात 15 ते 20 रुपये किलो भावाने विक्री होत होती.