गणेश मंडळांसाठी पालिकेची “एक खिडकी’ योजना

सर्व परवाने एकाच ठिकाणी : मंडळांची होती मागणी

पुणे – शहरातील गणेश मंडळांच्या मागणीनुसार, मंडळांना देण्यात येणारे सर्व परवाने एकाच ठिकाणी उपलब्ध करून देण्यासाठी महापालिका प्रशासनाकडून “एक खिडकी’ योजना राबविण्याचा निर्णय घेतला आहे. त्या ठिकाणी, मांडव, पोलीस तसेच महावितरणसह इतर सर्व परवाने एकाच ठिकाणी देण्यात येणार असून क्षेत्रीय कार्यालयस्तरावर हा उपक्रम राबविण्यात येणार आहे. दरम्यान, येत्या 16 ऑगस्ट पर्यंतच हे परवाने दिले जाणार असून त्यानंतर आलेल्या अर्जांचा विचार केला जाणार नसल्याचे प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले.

न्यायालयाने दिलेल्या मार्गदर्शक सूचनांनुसार, महापालिका प्रशासनाकडून 20 जुलैपासून ऑनलाइन यंत्रणा उपलब्ध करून देण्यात आली आहे. महापालिका व पोलिसांच्या संयुक्‍त माध्यमातून ही सेवा उपलब्ध करून दिली आहे. तसेच, रनिंग मंडप व कमानींसाठी ऑफलाइन स्वरुपात परवानगी दिली जात आहे. तरीही गणेश मंडळांना इतर अनेक परवानग्या व ना हरकत दाखले घेण्यासाठी विविध सरकारी यंत्रणांच्या कार्यालयात जावे लागत असल्याने आवश्‍यक सर्व परवानग्या एकाचवेळी दिल्या जाव्या, असा आदेश महापौर मुक्‍ता टिळक यांनी दिला होता. अतिरिक्त आयुक्‍त शान्तनु गोयल यांनी तातडीने बैठक घेत सर्व विभागप्रमुखांना तशा सूचना केल्या होत्या. त्यानुसार, महापालिकेने क्षेत्रीय कार्यालयाच्या स्तरावर “एक खिडकी’ योजना राबविण्याचा निर्णय घेतला आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.