‘या’ कारणामुळे अमेरिकेत आज एकाला मृत्यूदंडाची शिक्षा

तेरे हाऊते – अमेरिकेत आज आणखी एकाला मृत्यदंडाची शिक्षा देण्यात आली. डस्टीन हिग्ज असे आज मृत्यूदंड देण्यात आलेल्या इसमाचे नाव आहे. त्याने मेरीलॅंडमध्ये तीन महिलांची हत्या केली होती. या आठवड्यात अमेरिकेत देण्यात आलेला ही तिसरी मृत्यूदंडाची शिक्षा आहे.

गेल्या जुलै पासून आत्तापर्यंत ट्रम्प प्रशासनाकडून एकूण तेरा जणांच्या मृत्यूदंडाच्या शिक्षेची अंमलबजावणी करण्यात आली आहे. अमेरिकेत मृत्यूदंडाच्या शिक्षेवर 17 वर्ष बंदी होती. पण ट्रम्प प्रशासनाने गेल्या जुलै महिन्यात ही बंदी उठवली व त्यानंतर आजपर्यंत एकूण तेरा जणांना या शिक्षा देण्यात आल्या. तेथे विशिष्ट इंजेक्‍शन देऊन संबंधीत आरोपीला मृत्यूदंड दिला जातो.

गेल्या 120 वर्षात अमेरिकेत कोणत्याही अध्यक्षाच्या काळात इतक्‍या मोठ्या प्रमाणात मृत्यूदंडाच्या शिक्षेची अंमलबजावणी करण्यात आलेली नाही. बुधवारी लिसा मोंटगोमेरी या महिलेला मृत्यूदंड देण्यात आल्यानंतर हिग्ज आणि कोरे जॉन्सन या दोन पुरूषांनाही मृत्यूदंड देण्यात आला आहे. ट्रम्प प्रशासन हे मृत्यूदंडाच्या शिक्षेबाबत अत्यंत आग्रही प्रशासन मानले गेले आहे. नवनियुक्त अध्यक्ष बायडेन यांनी मात्र मृत्यूदंडाची शिक्षा बंद करण्याचा मनोदय व्यक्त केला आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.