भवानीनगर (वार्ताहर) -सपकळवाडी (ता. इंदापूर) गावामध्ये बारामती येथील वीज वितरण मंडळाच्या वतीने एक गाव एक दिवस उपक्रमाद्वारे गावातील विजेबाबतची सर्व कामे एकाच दिवसात पूर्ण करण्यात येत आहेत, अशी माहिती सरपंच सचिन सपकळ यांनी दिली.
सपकळवाडी गावातील विजेची कामे पूर्ण केली. गावातील ज्या काही अडचणी होत्या त्या सर्व अडचणी एका दिवसामध्ये पूर्ण केल्या आहेत. त्यामुळे बारामती वीज वितरण विभागाची संकल्पना फायदेशीर ठरत आहे.
बारामती परिमंडलचे मुख्य अभियंता सुनील पावडे यांच्या संकल्पनेतून, अधीक्षक अभियंता चंद्रशेखर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली व कार्यकारी अभियंता बारामती विभाग जी. एम. लटपटे यांच्या नेतृत्वाखाली, उपकार्यकारी अभियंता वालचंदनगर उपविभाग एम. व्ही. सूळ, विषय शाखा अभियंता तावशी एम. जी. चौगुले, जनमित्र एम. बी. लगड, एस. पी. म्हेत्रे, आर. एस. ओतेकर, राष्ट्रवादीचे जिल्हा सरचिटणीस विनोद सपकळ, सदस्य शिवाजी सपकळ, तंटामुक्तीचे अध्यक्ष रविंद्र सपकळ, शिवाजी सपकळ यांनी ही मोहीम राबविली. यावेळी ढिल्या झालेल्या तारा ओढणे, फांद्या तोडणे, स्पेसर, वीज खांब आदी कामे केली आहेत.