#SAvENG : कॅगिसो रबाडावर ‘या’ कारणामुळे एका सामन्याची बंदी

पोर्ट एलिझाबेथ : दक्षिण आफ्रिकेचा वेगवान गोलंदाज कॅगिसो रबाडावर आयसीसीने नियमाचे उल्लघंन केल्याप्रकरणी एका सामन्याची बंदी घातली आहे. त्यामुळे दक्षिण आफ्रिका आणि इंग्लंड दरम्यान सुरू असलेल्या कसोटी मालिकेदरम्यान यजमान दक्षिण आफ्रिकेला मोठा झटका बसला आहे.

चार कसोटी सामन्यांच्या मालिकेतील तिसरा कसोटी सामना पोर्ट एलिझाबेथ येथे सुरू आहे. इंग्लंडविरूध्दच्या तिस-या कसोटीतील पहिल्या दिवशी रबाडाने कर्णधार जो रूटचा त्रिफळा उडविला. त्यावेळी रबाडाने आकम्रक सेलिब्रेशन केले.

त्यामुळे त्याला एक डिमेरीट पाॅइंट मिळाला. मागील दोन वर्षातील त्याचा हा चौथा डिमेरिट पाॅइंट आहे. त्यामुळे त्याच्यावर नियमानुसार एक कसोटी सामन्याची बंदी आली आहे.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here