fbpx

शोपियॉंमधील चकमकीत एक दहशतवादी ठार

श्रीनगर – जम्मू-काश्‍मीरमधील चकमकीत सोमवारी सुरक्षा दलांनी एका दहशतवाद्याचा खात्मा केला. ठार झालेल्या दहशतवाद्याची ओळख तातडीने पटू शकली नाही.

शोपियॉं जिल्ह्यात दहशतवाद्यांचे अस्तित्व असल्याची माहिती सुरक्षा दलांना मिळाली. त्यानंतर दहशतवाद्यांच्या शोधासाठी सुरक्षा जवानांनी मोहीम हाती घेतली.

त्या मोहिमेवेळी जवान आणि दहशतवादी आमनेसामने येऊन दोन्ही बाजूंमध्ये चकमक झडली. त्यामध्ये एका दहशतवाद्याला ठार करण्यात सुरक्षा जवानांना यश आले.

चालू वर्षी जम्मू-काश्‍मीरात सुरक्षा दलांकडून दहशतवाद्यांविरोधात धडक मोहिमा राबवल्या जात आहेत. त्यामध्ये आतापर्यंत मोठ्या संख्येने दहशतवादी मारले गेले आहेत.

दहशतवादी संघटनांसाठी तो जबर झटका मानला जात आहे. सुरक्षा दलांच्या सतर्कतेमुळे सीमेपलिकडून भारतीय हद्दीत घुसखोरी करण्याचे दहशतवाद्यांचे डावही सातत्याने उधळले जात आहेत.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.