वन प्लसची स्मार्ट टीव्ही सादरीकरणाची तयारी

नवी दिल्ली – अँड्रॉइड आणि कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करून इंटरनेट हाताळू शकेल, असा स्मार्ट टीव्ही परवडणाऱ्या दरात उपलब्ध करण्याची वन प्लस कंपनीची योजना अंतिम टप्प्यात असून त्याचे सादरीकरण लवकरच होण्याची शक्‍यता आहे.
कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी पेट लावू यांनी गेल्या वर्षी डिसेंबर महिन्यात स्मार्ट टीव्ही सादर करण्याचे वक्‍तव्य केले होते.

याबाबत औपचारिक पातळीवर कंपनीचे अधिकारी सांगतात की हा टीव्ही सर्वसामान्य लोकांना परवडेल असा असेल.
त्यामुळे टीव्ही बाजारपेठेत मोठ्या प्रमाणात फेरबदल होण्याची शक्‍यता आहे. या ठेवीत अँड्रॉइड सॉफ्टवेअर असेल. त्याचबरोबर इंटरनेट हाताळू शकणारी कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित तंत्रज्ञान असणार आहे. त्यामुळे हा वेगळाच अनुभव असणार असून भारतातच सुरुवातीला त्याचे सादरीकरण केले जाण्याची शक्‍यता आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.