भोर -भोर तालुक्यात शनिवारी (दि. 8) शिवरे येथील एकाचा करोना तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आला आहे, अशी माहिती गटविकास अधिकारी विशाल तनपुरे व तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. सूर्यकांत कऱ्हाळे यांनी दिली. भोर तालुक्यातील करोना बाधितांची आजपर्यंतची संख्या 259 वर पोहोचली आहे. यातील 182 जणांनी करोनावर मात केली.
70 करोनाबाधित रुग्णांवर भोर, नसरापूर, व पुणे येथे उपचार सुरु आहेत. आजअखेर करोनामुळे 8 जणांनी जीव गमवला आहे, तर 44 जणांचे अहवाल बाकी आहेत. असे गटविकास अधिकारी तनपुरे यांनी सांगितले.
करोनाला रोखण्यासाठी नागरिकांनी नियमांचे पालन करावे, असे आवाहन उपविभागीय अधिकारी राजेंद्रकुमार जाधव व तहसीलदार अजित पाटील यांनी केले आहे.