शिरूर : शिरूर शहरातील डंबेनाला येथील छोटूभाई फकीर मोहम्मद शेख (वय ८५ वर्ष) यांना बीडी पीने चांगलेच महागात पडले असून त्यांचा बिडी पिताना बिडी लुंगीवर पडून कपड्यांना आग लागून होरपळून त्यांचा मृत्यू झाला आहे.
त्यांना पॅरालिसिस चा आजार असून ते घरामध्येच असतात त्यांना बीडी पीण्याचे व्यसन होते. याबाबत शिरूर पोलिस स्टेशन येथे त्यांचा मुलगा हमीद छोटू शेख (वय 48 वर्ष) यांनी आकस्मित निधनाची खबर दिली आहे. शिरूर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार दि.४ डिसेंबर रोजी दुपारी मयत छोटूभाई बुधवारी बिडी पित होते.
यावेळी त्यांच्या लुंगीला आग लागली यावेळी घरातील नातेवाईकांनी आग विझवण्यासाठी प्रयत्न केला. मात्र ते भाजल्याने त्यांना रुग्णालयात दाखल केले होते. हॉस्पीटलमध्ये उपचार सुरू असताना त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस निरीक्षक संदेश केंजळे यांच्या मार्गदर्शनाखाली पो. हवा राउत हे करत आहे. पोलिसांनी सदर प्रकरणी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे.