वडाची वाडी येथील मुलाचे अपहरण करणारा आरोपी जेरबंद

पुणे – वडाची वाडी येथे घराच्या बाहेर खेळत असलेल्या दोन वर्षाच्या मुलाचे अपहरण करून 10 लाख रुपयांची खंडणी मागणाऱ्या उत्तरप्रदेश येथील व्यक्तीला गुन्हे शाखा युनिट तीनच्या पोलिसांनी जेरबंद केले आहे. विकास रामभवन चौव्हाण (वय-20,रा.कुशीनगर, उत्तरप्रदेश) असे अटक केलेल्या आरपीचे नाव आहे.

पुष्कराज या सोमनाथ तानाजी धनवडे (रा. वडाची वाडी) यांच्या मुलाचे अपहरण करण्यात आले होते. 23 मार्च रोजी पुष्कराज हा घराच्या बाहेर खेळत असताना त्याचे अपहरण करण्यात आले होते. याबाबत कोंढवा पोलीस ठाण्यात अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आलेला होता

मुलाचे अपहरण झाले त्याच दिवशी गुन्हे शाखेचे सर्व युनीट आणि खंडणी विरोधी पथकाने केलेल्या तपासामुळे मुलाची त्याच दिवशी सुखरुप सुटका करून आरोपी पळून गेला होता. तेव्हापासून पोलीस त्याच्या मागावर होते. याबाबत गुन्हे शाखा युनिट तीनचे पथक तपास करत असताना गुन्हे शाखा युनिट एकचे सहाय्यक पोलीस आयुक्त समीर शेख यांना आरोपी मांजरी परिसरात असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार गुरूवारी कारवाई करत पोलिसांनी चौव्हान याला अटक केली आहे. त्याने पोलिसांकडे गुन्ह्याची कबुली दिली असून आरोपीस कोंढवा पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले असल्याची माहिती मिळाली आहे.

अपर पोलीस आयुक्त प्रदीप देशपांडे, पोलीस उपायुक्त शिरीष सरदेशपांडे, सहायक पोलीस आयुक्त समीर शेख यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक दीपक निकम, सहायक पोलीस निरीक्षक संदीप देशमाने, पोलीस उपनिरीक्षक अजय म्हेत्रे, संजय गायकवाड, किरण अडागळे, सहायक पोलीस फौजदार दत्तात्रय गरूड, अनिल शिंदे, किरण शिंदे, दीपक मते, प्रवीण तापकीर, मेहबुब मोकाशी, रामदास गोणते, संतोष क्षीरसागर, शकील शेख, मच्छिंद्र वाळके, गजानन गानबोटे, विल्सन डिसोझा, संदीप राठोड, अतुल साठे, संदीप तळेकर, सचिन गायकवाड, कैलास साळुंके, कल्पेश बनसोडे, सागर तोरडमल यांच्या पथकाने ही कारवाई केली.

Leave A Reply

Your email address will not be published.