सातारा – सातारा जिल्हा कारागृहातील एका रुग्णाचा करोना रिपोर्ट पाँझिटिव्ह आला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील करोनाबाधितांची संख्या आता १२५ झाली आहे. सातारा जिल्हा कारागृहातील करोनाबाधितांच्या निकट सहवासातील २६ वर्षीय रुग्णाचा अहवाल करोना पाँझिटिव्ह आला असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. आमोद गडीकर यांनी दिली आहे.
कराडच्या वेणूताई चव्हाण उपजिल्हा रुग्णालयातील ९९, फलटणच्या उपजिल्हा रुग्णालयातील २ व कोरेगावच्या ग्रामीण रुग्णालयातील १४ अशा एकूण ११५ जणांचे अहवाल निगेटिव्ह आले.
काल दि. १४ मे रोजी रात्री उशिरा सातारच्या क्रांतीसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालयात ८ जणांना विलगीकरण कक्षात दाखल करण्यात आले आहे. या सर्वांच्या घशातील स्त्रावांचे नमुने बी. जे. वैद्यकीय महाविद्यालयाकडे तपासणीसाठी पाठविण्यात आल्याची माहितीही जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. गडीकर यांनी दिली.जिल्ह्यात आतापर्यंत करोनाबाधित झालेल्या व्यक्तिंची संख्या १२५ झाली असून यापैकी ७८ जणांवर उपचार सुरु अहेत. ४५ जण करोनामुक्त होऊन घरी गेले आहेत. दोन करोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे.