सातारा – करोनाला रोखण्यासाठी बाहेरच्या जिल्ह्यातील लोकांना जिल्ह्यात प्रवेश बंद करण्यात आला आहे. तरीही कोणत्याही ठोस कारणाशिवाय परजिल्ह्यातून जिल्ह्यात प्रवेश केल्याने संतोष गोरख सावंत (रा. ताथवडे जि. पुणे) याच्यावर सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी हवालदार श्रीरंग यादव यांनी फिर्याद दिली आहे.
जिल्हाबंदी असतानाही संशयित स्वीफ्ट कारने (एमएच 13 एचडब्ल्यू 7371) पुणे ते सातारा असा प्रवास करीत जिल्ह्यात प्रवेश केला. बॉम्बे रेस्टॉरंट परिसरात याबाबत संशयिताकडे परजिल्ह्यातून येण्यासाठीचे अत्यावश्यक कारण व परवानगी याबाबत विचारणा केल्यानंतर त्याच्याकडे ठोस कारण व परवानगी नसल्याचे समोर आल्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाचा भंग केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.