‘काजू’ एक फायदे अनेक, शेवटचा फायदा नक्की वाचा

...म्हणून काजू लाभदायक ठरतो

काजूचे फळ मधुर, तुरट, धातूवर्धक असते. ते वायू, कफ, कृमी हे विकार दूर करते. याशिवाय हे फळ वातशामक, भुकेसाठी उत्तम व हृदयासाठी हितकर असते. मूळव्याधीवरही काजू गुणकारी ठरतो. हृदयाच्या दुर्बलतेवर व स्मरणशक्‍तीच्या क्षीणतेवर काजू लाभदायक ठरतो. काजूच्या बीमध्ये व बीमधून निघणाऱ्या तेलात प्रोटीन आणि जीवनसत्व “बी’ पुष्कळ प्रमाणात असते. तसेच काजूतील प्रोटीन शरीरात खूपच लवकर पचते. त्यामुळेच काजूच्या सेवनाने शरीराची वाढ चांगली होते व वजन वाढते. काजूच्या बीमधून पिवळ्या रंगाचे तेल निघते. ते तेल ऑलिव्हच्या तेलापेक्षा अधिक गुणकारी, श्रेष्ठ व पौष्टिक असते.

गृहोपयोगी कानमंत्र-
– थंडीमध्ये पहाटे रिकाम्या पोटी 4-5 काजू खाऊन व एक चमचा मध खाल्ल्यास बुद्धिशक्‍तीत व स्मरणशक्‍तीत वाढ होते.
– काजूचे पिकलेले फळ खाल्ल्याने पोटातील नळविकार नाहीसा होतो.
– काळ्या मनुका किंवा ताज्या द्राक्षांबरोबर 4-5 काजू खाल्ल्याने अजिर्णचा तसेच उष्णतेने झालेला मलावरोधाचा त्रास दूर होतो.
– काजूचे तेल त्वचेवरील चामखिळ्यांवर चोळल्याने फायदा होतो. तसेच पायांना पडलेल्या भेगांवर काजूच्या तेलाने मालीश केले असता फायदा होतो.
– काजू गरम असल्याने ते जास्त प्रमाणात खाल्ल्यास घोळणा फुटण्याचा त्रास होऊ शकतो. यास्तव काजूबरोबर द्राक्ष, मध किंवा साखर यांचे सेवन केल्यास त्रास कमी होतो.
– ओले काजू सोलताना गरम पाण्यात थोडा वेळ घालावेत. साले लवकर निघतात.

ओल्या काजूची उसळ
दोन वाटी ओले काजू गरम पाण्यात भिजवून सोलून घ्यावे, नारळ, हिरवी मिरची, जिरे वाटून घ्यावे. पातेल्यात फोडणीत नारळाचे वाटण व काजू परतून त्यात पाणी, मीठ घालून उकळावे. शिजल्यावर वरून चिरलेली कोथिंबीर घालावी.

काजू बिस्किटे
साहित्य- दीड कप कणीक, 1 वाटी काजूचा चुरा, अर्धी वाटी काजूचे तुकडे, अर्धा कप लोणी, पाऊण कप पिठीसाखर, चिमूटभर मीठ.
कृती- काजूचे तुकडे सोडून इतर सर्व साहित्य एकत्र करा. गरजेनुसार पाण्याचा किंवा दुधाचा हात लावून गोळा बनवा. त्याच्या जाडसर पोळ्या लाटून वाटीने किंवा साच्याने बिस्किटे कापा. प्रत्येक बिस्किटावर काजूचे तुकडे दाबून बसवा. ओव्हनमध्ये 10-15 मिनिटे भाजून घ्या.

 

 

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.