One Nation One Election । प्रदीर्घ प्रतिक्षेनंतर केंद्र सरकार हिवाळी अधिवेशनात आज लोकसभेत ‘वन नेशन वन इलेक्शन’ विधेयक मांडणार आहे. कायदा मंत्री अर्जुन मेघवाल दुपारी 12 वाजता हे विधेयक मांडणार आहेत. भारतीय जनता पक्षानेही आपल्या खासदारांसाठी व्हिप जारी केला आहे. सरकारच्या विधेयकाला एनडीएच्या घटक पक्षांचाही पाठिंबा मिळाला आहे, तर विरोधकांनी या विधेयकाला विरोध करण्याची योजना आखली असल्याची माहिती समोर येत आहे.
आज लोकसभेत या विधेयकावर विरोधकांकडून गदारोळ होण्याची शक्यता आहे. गेल्या गुरुवारी मोदी सरकारने मोठे पाऊल उचलत भारतातील ‘वन नेशन वन इलेक्शन’ या कायद्याशी संबंधित विधेयक केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजूर केले. यापूर्वी सप्टेंबर महिन्यात मंत्रिमंडळाने माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या उच्चस्तरीय समितीच्या प्रस्तावांनाही मंजुरी दिली होती.
‘वन नेशन वन इलेक्शन’ कायदा झाला तर निवडणुका कशा होणार? One Nation One Election ।
प्रस्तावित कायद्यानुसार दोन टप्प्यात त्याची अंमलबजावणी करण्याची तयारी सुरू आहे. पहिल्या टप्प्यात लोकसभा आणि विधानसभा निवडणुका एकाच वेळी होणार असून 100 दिवसांत दुसऱ्या टप्प्यात नगरपालिका आणि पंचायतींच्या निवडणुका घेण्याची तयारी सुरू आहे.
सरकारने केली ‘ही’ तयारी One Nation One Election ।
आता हा कायदा आणण्यासाठी उद्या, मंगळवारी (१७ डिसेंबर) दुपारी १२ वाजता केंद्र सरकारच्या वतीने केंद्रीय कायदा मंत्री अर्जुन मेघवाल लोकसभेत मांडणार आहेत. यासाठी भाजपने आपल्या सर्व खासदारांना सभागृहात उपस्थित राहण्यास सांगितले आहे.
विधेयकातील कलमे आणि तथ्यांबाबत कोणाला काही आक्षेप असल्यास सरकार ते संसदीय समितीकडे पाठवू शकते, असे मानले जाते. सध्या सरकारमधील घटक पक्षांनी या विधेयकाला पाठिंबा दिला आहे, तर राजकीय कारणांमुळे विरोधक या विधेयकाच्या विरोधात आहेत. यावर उद्या सभागृहात गदारोळ होण्याची शक्यता आहे. हे विधेयक उद्या लोकसभेत मंजूर करण्यासाठी सरकारने सध्या पूर्ण तयारी केली आहे.
हेही वाचा
Border-Gavaskar Trophy 2024/25 | विराट कोहलीने सचिनकडून प्रेरणा घ्यावी – सुनील गावस्कर