39 फाटा येथे एकाचा खून

भवानीनगर- 39 फाटा (ता. इंदापूर) येथील रमजान लालासाहेब शेख (वय 35) यांचा अज्ञात व्यक्‍तीने धारदार शस्त्राने गळा चिरून खून केला. याबाबत वालचंदनगर पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्‍तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत वालचंदनगर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बुधवार (दि.4) रोजी रात्री नऊ ते गुरुवार (दि.5) रोजी पहाटे सहाच्या दरम्यान रमजान शेख यांचा खून केला आहे. घटनेची माहिती मिळताच बारामतीचे उपविभागीय पोलिस अधिकारी नारायण शिरगावकर यांनी तातडीने घटनास्थळी भेट देऊन माहिती घेतली. पुढील तपास वालचंदनगर पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक दिलीप पवार करीत आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.