काँग्रेसमधील राजीनामा सत्र सुरूच; आणखी एका ‘बड्या’ नेत्याचा राजीनामा

नवी दिल्ली – नुकत्याच पार पाडलेल्या लोकसभा निवडणुकांमध्ये काँग्रेसच्या पदरात पडलेल्या निराशाजनक पराभवानंतर काँग्रेसमध्ये राजीनामासत्र सुरू झाले आहे. या पराभवाची सर्वप्रथम जवाबदारी स्वीकारत काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी आपल्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता. काँग्रेसमधील प्रमुख नेत्यांनी राहुल गांधी यांनी आपला राजीनाम्याचा निर्णय मागे घ्यावा अशी मागणी केल्यानंतर देखील राहुल गांधी हे आपल्या निर्णयावर ठाम असून अशातच आता काँग्रेसचे राजस्थानमधील निवडणूक उप-प्रभारी तथा अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सचिव तरुण कुमार यांनी आपला राजीनामा सादर केला आहे.

तरुण कुमार यांनी याबाबत राहुल गांधी यांना एक पत्र लिहिले असून यामध्ये त्यांनी लोकसभा निवडणुकांमध्ये पक्षाच्या दारुण पराभवाची जबाबदारी स्वीकारत आपण राजीनामा देत असल्याचे म्हंटले आहे. आपण आपल्या पदाचा राजीनामा देत असलो तरी यापुढे देखील पक्ष कार्य सुरूच ठेवणार असल्याचं त्यांनी पत्राद्वारे म्हंटले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.