पुणे- पुण्यातील कोरोनाग्रस्त रुग्णांच्या संख्येत एकने भर पडली आहे. संबंधित व्यक्ती पुण्याचे स्थायिक असून त्यांनी परदेश दौरा केला नाही आहे.
त्या व्यक्तीचं वय ५० असून त्यांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आलेली आहे. संबंधित पुरुषावर केईएम हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. त्यांना मधुमेहाचा त्रास असल्याची माहिती मिळालेली आहे.
दरम्यान, दिवसेंदिवस पुण्यात कोरोनाची संख्या वाढतंच असल्यामुळे शासनाच्या सुचनेचं पालन करणे जास्त गरजेचं आहे.