मुंबई – अजित पवार गटाचे नेते बाबा सिद्दिकी हत्या प्रकरणात मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने आणखी एका आरोपीला अटक केली आहे. गौरव विलास अप्पुने असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. या प्रकरणात त्याचा सहभाग असल्याची पुष्टी झाली आहे. त्याला हत्येची पूर्ण माहिती असल्याचे तपासात निष्पन्न झाल्याचे अधिका-यांनी सांगितले आहे. या प्रकरणातील ही १६ वी अटक आहे.
गुन्हे शाखेच्या अधिका-यांनी सांगितले की, तपासादरम्यान हत्येचा कट रचण्यासाठी गौरव हा अनेकदा इतर आरोपींना भेटला होता. शूटर्सच्या पहिल्या बॅचच्या देखील संपर्कात होता, ज्यांना याआधी बाबा सिद्दिकी यांना मारण्याची सुपारी दिली होती. गुन्हे शाखेचे पथक गौरवला न्यायालयात हजर करणार आहे. या प्रकरणाचा पोलिस अधिक तपास करत आहेत.